• MyPassion
मंत्रालया पाठोपाठ आता जिल्हाधिकारी कार्यालयातही अभ्यागतांचा प्रवेश बंद .
20 Mar, 2020

मंत्रालयापाठोपाठ आता जिल्हाधिकारी कार्यालयातही अभ्यागतांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशानं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात येणा-या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचे निर्देश शासनानं दिले आहेत त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना पुढील आदेश मिळेपर्यंत अधिका-यांना प्रत्यक्ष भेटता येणार नाही. अतिमहत्वाच्या कामासाठी तसंच अत्यंत तातडीचं टपाल, संदेश ईमेलद्वारे पाठवावे असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं आहे. दैनंदिन टपाल आणि इतर महत्वाच्या कामासाठी येणा-या कर्मचा-यांच्या सोयीसाठी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच टपाल स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता कलेक्टर ठाणे ॲट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत, त्यावर प्रशासन ७ दिवसात कार्यवाही करेल असं जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केलं आहे. शासकीय कार्यालयातील कर्मचा-यांची उपस्थिती नोंदवण्यासाठीची बायोमेट्रीक हजेरी प्रणालीही बंद करण्यात आली आहे.