• MyPassion
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर .
08 Jun, 2019

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकालजाहीर झाला असून ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा निकालाचा टक्का कमालीचा घसरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या १२.३१ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या काही वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यंदा १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे, ८८.३८ टक्के तर, नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ६७.२७ टक्के लागला आहे. राज्यातील तब्बल १७९४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच प्रसिद्ध अभिनेते कांचन पगारे यांचा मुलगा विहंग पगारे हा ९३. ६० टक्क्याने उत्तीर्ण. तर बदलापूर येथील संकेत बामणे याने ८८ टक्के मिळवून यश संपादन केल आहे. तसेच अमृता देसाई हिने देखील ९१ टक्के मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे . आवाज माझा वृत्त वाहिने तर्फे दहावीच्या परीक्षे मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन आणि सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा