• MyPassion
महापालिकेच्या उत्पन्न वाढीचे नवीन स्रोत शोधण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश.
09 Oct, 2019

मालमत्ता कर, पाणीपट्टी, शहर विकास विभाग, अग्निशमन दल आदी विभागांशिवाय उत्पन्न वाढीचे नवीन स्रोत शोधण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी, शहर विकास विभाग, अग्निशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जाहिरात विभाग आदी महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत. पण याशिवाय उत्पन्नाचे नवीन कुठले स्रोत निर्माण होऊ शकतात का याचा अभ्यास ही समिती करणार आहे. निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर ही समिती याबाबत अभ्यास करणार आहे. इतर राज्यांमध्ये तसंच शहरांमध्येही या पारंपरिक उत्पन्नाच्या स्रोतांशिवाय इतर कुठले स्रोत आहेत का, त्या माध्यमातून उत्पन्न कसे वाढवता येईल याचा अभ्यास करून ही समिती आपला अहवाल महापालिका आयुक्तांना सादर करणार आहे.