• MyPassion
महापालिकेच्या सात प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाचा मान यंदा महिलांना .
09 Jul, 2019

ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीपैकी तब्बल सात प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाचा मान यंदा महिलांना मिळाला आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये मनोमिलन झाल्याने सर्वचच्या सर्वच प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडही बिनविरोध झाल्या आहेत. तर शिवसेनेने सर्वाधिक पाच महिलांना अध्यक्षपद दिले असून त्या खोलाखाल भाजप आणि राष्ट्रवादीनेही महिलांना संधी दिल्याचे दिसून आले आहे. नऊ प्रभाग समितीच्या अध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सोमवारी या प्रभाग समितीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार उथळसर प्रभाग समितीत दिपा गावंड , कळवा प्रभाग समितीत जितेंद्र पाटील , मुंब्रा प्रभाग समिती अशरीन राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर शिवसेनेकडून नम्रता पमनानी , पज्ञा भगत , दिपाली भगत , निर्मला कनसे, शिल्पा वाघ आणि नरेश सुरकर आदींसुध्दा बिनविरोध निवड झाली आहे. तर या प्रभाग समितीमध्ये शिवसेनेकडून पाच महिला, राष्ट्रवादी आणि भाजपकडून प्रत्येक एक अशा एकूण सात नगरसेविकांना यंदा अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. तर प्रभाग समितींवर पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले असून त्यांच्या वाट्याला सहा, राष्ट्रवादी दोन आणि भाजपच्या वाटेला एक प्रभाग समिती आली आहे.