• MyPassion
लंडनमध्ये दहशतवादी हल्ला.
04 Jun, 2017

लंडनमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहा जण ठार व 46 जण जखमी झाले आहेत. ब्रिजवर हल्लेखोरांनी पादचार्यांना भरधाव गाडीने चिरडले आहे. लंडनमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले झाल्याचे वृत्त आहे. हल्ला करणार्या तीन संशयितांना पोलिसांनी ठार केले आहे, अशी माहिती मार्क रोले या ब्रिटनच्या दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकार्याने दिली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच अवघ्या आठ मिनिटांमध्ये कारवाई करत पोलिसांना हल्लेखोरांना ठार केले. गुरुवारी येथे निवडणूक होत आहे. निवडणूक तीन दिवसांवर आली असताना व रविवारची सुटी असल्यामुळे प्रचार शिगेला पोहचला होता. परंतु, दहशतवादी हल्ला झाल्यामुळे सर्व पक्षांनी मिळून प्रचार थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देश प्रथम व निवडणूक नंतर असे येथील राजकीय पक्षांनी दाखवून दिले आहे. शिवाय, या हल्ल्याचा सर्व पक्षांनी मिळून निषेध व्यक्त केला आहे.