• MyPassion
लोकशाहीला सुदृढ बनविण्यासाठी मतदान करा - अप्पर जिल्हाअधिकाऱ्यांचे  आवाहन .
18 Oct, 2019

लोकशाहीचा उत्सव येत्या 21 ऑक्टोबरला आपणा सगळयांना साजरा करायचा आहे. त्यासाठी या दिवशी आपल्या सोसायटीतील एकही नागरिक मतदान प्रक्रीये पासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी सुजाण नागरिक म्हणून आपणा सर्वांवर आहे. त्यामुळे लोकशाहीला सुदृढ बनविण्यासाठी मतदान करा असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांनी केले.आज गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गडकरी रंगायतन येथे संपन्न झाली त्यावेळी त्याबोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील, जिल्हा हौसिंग फेडरेशन अध्यक्ष सीताराम राणे.उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा  स्वीप नोडल  अधिकारी रेवती गायकर उपस्थित होत्या. गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना श्रीमती.रानडे यांनी निवडणुक आयोग मतदान प्रक्रिया कशा प्रकारे राबवतो याची माहिती सुलभशैलीत दिली. मतदानाच्या दिवशी सुट्टी असली जाहीर करण्यात आली आहे. ते केवळ मतदान प्रक्रीयेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शंभर टक्के गृहनिर्माण संस्थेचे नागरिक मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी व्यासपीठावरील इतर मान्यवरांनी देखील समयोजित मनोगत व्यक्त केले.  यावेळी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.