• MyPassion
कचर्याची विल्हेवाट न लावणाऱ्या गृहसंकुलावर कडक धोरण राबवण्याचे पालिका प्रशासनाचे संकेत.
05 Oct, 2019

आधी लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीतव्होटबँक सांभाळणार्‍या लोकप्रतिनिधींना कचर्‍याची विल्हेवाट न लावणार्‍या ठाण्यातीलगृहसंकुलावर कारवाई होऊ नये म्हणून पुढाकार घेतला. निवडणुकीनंतर मात्र अशा गृहसंकुलांविरोधातकडक धोरण राबवण्याचे संकेत पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.शहरातील बड्या गृहसंकुलाना आणि आस्थापनांनाकचरा विल्हेवाटीची सक्ती करण्याचा ठाणे महापालिकेचा प्रयोग काही अंशी फसल्यानंतर पालिकाप्रशासनाने पुन्हा एकदा यासाठी प्रयत्न सुरु केले होते. कचरा विल्हेवाटीसाठी गृहसंकुलांच्याअडचणी समजून घेऊन प्रत्येक मोठ्या गृहसंकुलांमध्ये स्वतः स्वच्छता निरीक्षक जाऊन त्याबाबतजनजागृती करणार आहे. संकुलात कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प सुरु करायचा असल्यास वेंडरचीयादी देखील ठाणे महापालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी सकारात्मकपरिणाम होणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता.ठाणे सिटीजन फाउंडेशनचे संस्थापक कॅसबरऑगस्टीन यांच्या म्हणण्यानुसार बरीच गृहसंकुले ओला आणि सुका कचरा वेगळा करून ठाणे महापालिकेलादेतात. मात्र पालिकेच्या वतीने हा कचरा पुन्हा एकत्र करूनच नेला जातो. गृहसंकुलांमध्येगाडी पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही तर प्रकल्प कसा उभारणार? हा प्रकल्प खर्चिकही आहे.त्यामुळे पालिकेने व्हेंडरची यादी जाहीर केली असली तरी त्यांना प्रकल्प राबवण्यासाठीजागा लागणारच आहे. ठाणे महापालिका ही जागा उपलब्ध करून देणार असेल तर गृहसंकुलांनाहीजागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा हा प्रकल्प राबवण्यासाठी सवलत द्यावी, अशी मागणी ऑगस्टीनयांनी केली आहे.जी संकुले कचर्‍याची विल्हेवाट त्यांच्याचआवारात लावतात त्यांनी ठाणे महापालिकेकडे कर सवलतीसाठी रीतसर अर्ज करावेत असे आवाहनठाणे महापालिकेने केले आहे. स्वच्छता निरीक्षक प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन तो प्रकल्प बघणारअसून त्यानंतर अशा संकुलांना निश्‍चितच करात सवलत मिळेल असा विेशास पालिकेच्या वतीनेव्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय ज्या संकुलांना जागेची अडचण असेल अशा संकुलांनी कमीक्षमतेचे प्रकल्प सुरु करावेत इतर बाबींसाठी पालिका सहकार्य करेलच असे पालिकेच्या वतीनेस्पष्ट करण्यात आले आहे.