• MyPassion
जो तो पक्ष मलाईदार खाते मिळावे यासाठी भांडत असल्याचा भाजपचा आरोप 
04 Jan, 2020

काँग्रेस सेवादलाच्या मॅगजीन मध्ये गोडसे आणि सावरकर हे समलैंगिक आहेत असे लिहण्यात आले होत्या त्यावर हे निदनीय आहे सावकारांनी देशसाठी मोठे बलिदान केले आहे ,आता यावर शिवसेना काय भूमिका घेते आणि काँग्रेसला शिवसेना काय सांगणार ते पहिले पाहिजे .. तर  महाराष्ट्रात पहिल्या बाकावरील पक्ष बाहेर आहे, मात्र दुस:या, तिस:या आणि चवथ्या बाकावरील पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले आहे. ज्या सरकारकडून अद्याप मंत्र्यांचे खाते वाटपही होऊ शकलेले नाही. जो तो पक्ष आपल्याला मलाईदार खाते मिळावे यासाठी भांडतांना दिसत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय महामंत्री खासदार अरुण सिंह यांनी केला आहे. त्यामुळे महिनाभरातच हे सरकार जनतेसाठी काय करणार आहे, हे सर्वाना समजणार आहे. परंतु भाजपमध्ये विरोधी पक्षाची भुमिका योग्य प्रकारे बजावेल.असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.नागरीकत्व सुधारणा कायद्या संदर्भात माहिती देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी ते ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे गंभीर आरोप केले. सध्या देशात जीडीपीचा स्थर खाली आला आहे, हे त्यांनी यावेळी मान्य केले. मात्र येत्या दोन महिन्यात तो पुन्हा उसळी घेईल असा दावाही त्यांनी केला. दुसरीकडे राज्यस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये कॉंग्रेसच्या हाती सरकार गेल्यानंतर या ठिकाणाच्या सर्व योजना बंद करण्याचे काम त्यांनी केले आहे. या राज्यांमध्ये रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे कॉंग्रेसच आहे. मात्र आपल्या चुका लपविण्यासाठी ते केंद्रातील भाजप सरकारवर आरोप करीत आहे. मात्र या तीन राज्यांप्रमाणोच महाराष्ट्राची देखील हीच अवस्था होणार असल्याचे भाष्य त्यांनी यावेळी केले. तुमचे सरकार आहे, तर मग रोजगार निर्मिती करण्याचा अधिकार तुमचा आहे, उगाच केंद्र मदत करीत नाही, म्हणून टीका करणो अयोग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या 8 जानेवारीला रोजगार आणि इतर महत्वांच्या कारणांसाठी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात सत्तेत असलेली शिवसेनेही सहभागी होणार आहे, यावर त्यांना छेडले असता, शिवसेनेपुढे दुसरा पर्याय शिल्लक राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना सत्ता टिकवायची आहे, यामुळेच ते या बंदमध्ये सहभागी होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. वास्तविक पाहता, राज्यात तुमची सत्ता असतांना मागील 40 दिवस मंत्री पद मिळविल्यानंतर अद्यापही खाते वाटत करण्यात आलेले नाही. केवळ मलाईदार खाती मिळावीत म्हणून सध्या या तीनही पक्षांमध्ये भांडणे सुरु आहेत. त्यामुळे ते राज्याचा विकास काय करणार हे न सांगितलेच बरे असा टोलाही त्यांनी लगावला.