• MyPassion
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न .
14 May, 2019

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ग्राहकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन भवनातील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी जलसिंग वळवी, सहा. नियंत्रक वैधमापन, धान्य खरेदी अधिकारी सुनिल शिंदे, सहा. आयुक्त अन्न औषध प्रशासन, प्रादेशिक परिवहन कार्यालय, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जादा विजबील आकारणी व अन्य संदर्भात ग्राहकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींबाबत संबंधित यंत्रणेने केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. तसेच जनेरिक औषधे दुकानांबाबत सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासने यांनी आढावा सादर केला.अन्न औषधे प्रशासन या विभागाच्या अधिकाऱ्यांनी तबेल्यांमधील दुधाचे नमुने तपासणी घेण्याबाबतच्या कारवाईचा आढावा सादर केला. प्रत्येक विभागाने आपल्या मार्फत ग्राहकांच्या तक्रारींबाबत विहित मुदतीत कारवाई पूर्ण करावी. तसेच आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या ग्राहक सेवांबाबत अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी जलसिंग वळवी यांनी दिले.