• MyPassion
जपानहून मागवलेली 'स्त्री रोबोट' ठाण्याच्या व्हेज कँटीन मध्ये ठरली खवय्यांसाठी नवी पर्वणी  .
18 Sep, 2019

जरा विचार करा, आपण जेवायला बसलोयआणि आपले जेवण घेऊन येणारा एक माणूस नाही तरी चक्क यंत्रमानव म्हणजे रोबोट असेल तर?? दचकू नका, हे खरं आहे. ठाण्यातील "veg canteen" या हॉटेलच्या मालकांनी  baby doll नावाची स्त्री रोबोट जपानहून आणली आहे,जी आलेल्या सर्वाना त्यांनी ऑर्डर केलेले पदार्थ वाढते. हा रोबोट हॉटेल चे मालक शैलेंद्रआणि पूनम मौर्या यांनी दहा लाख रुपयात जपान हुन आणला असून हा महाराष्ट्रातला अशा प्रकारचापहिलाच रोबोट असून त्याच्यात टेबल चा नंबर टाकल्यावर तो बरोबर त्या टेबलवर जाऊन जेवणआणुन देतो.हा रोबोट मॅग्नेटिक्स आणि wifi द्वारेचालत असून आत्तापर्यंत चार ते पाच हजार ग्राहकांना त्याने जेवण सर्व्ह केले असल्याचीमाहिती शैलेंद्र यांनी दिली. जर एखादी व्यक्ती या रोबोटच्या मार्गात आली तर हा रोबोटत्या व्यक्तीला अत्यंत नम्रपणे "आपण माझ्या मार्गात उभे आहात, कृपया बाजूला व्हा"असे सांगतो. अशा या रोबोट ला पाहणे म्हणजे एक पर्वणीच असल्याने खवय्ये या हॉटेलमध्ये गर्दी करत आहेत. आपण इथे आल्यावर जेव्हा वेटरच्या जागी या रोबोटने जेवणआणले तेव्हा आपल्याला आश्चर्य झाल्याचे सर्वच ग्राहकांनी सांगितले. तंत्रज्ञान कितीप्रगत झाले आहे हे या प्रयोगावरून दिसते आणि भविष्यात अनेक ठिकाणी असले रोबोट दिसलेतर आश्चर्य वाटायला नको.