• MyPassion
जपान मध्ये बुलेट ट्रेनला तडा
14 Dec, 2017

जपानमधील सर्वाधिक जलद वाहतूक सेवा असलेल्या बुलेट ट्रेनच्या एका डब्याला तडा गेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या तड्यामुळे ट्रेन रूळांवरून घसरून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. सोमवारी दक्षिण जपानमधील एका स्टेशनहून बुलेट ट्रेन सुटल्यानंतर ट्रेनमधील कर्मचाऱ्यांना जळका वास, तसेच विचित्र आवाज आले. मध्य जपानमधील नागोया स्टेशनात ही ट्रेन थांबवून तपासणी केली असता, एका डब्याखालील चेसिसमध्ये तडा गेल्याचे, तसेच तेलगळती होत असल्याचे समोर आले. या ट्रेनमध्ये सुमारे एक हजार प्रवासी होते. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्या सर्व प्रवास्यांना दुसऱ्या ट्रेनमध्ये बसवून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.​