• MyPassion
गोदरेजने महापौरांकडे केले 1 लाख हॅण्डवॉश सुपुर्द
17 Mar, 2020

कोरोना या संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठी सतत हात हॅण्डवॉशने स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासाठी गोदरेज कंपनीच्या प्रोटेक्ट इंडिया मूव्हमेंटने पुढाकार घेतला असून आज त्यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे आज महापालिका कर्मचाऱ्यांसाठी 1 लाख हॅण्डवॉश सुपुर्द केले. यावेळी कोरोनापासून स्वत:ची काळजी घेण्यासाठी दैनंदिन जीवनात एकमेकांशी हस्तांदोलन न करता पारंपारिक पध्दतीने हात जोडून नमस्कार करावा असे आवाहन देखील महापौरांनी यावेळी केले.   Vo - महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, या व्हायरसचा सामना करण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. शहरात स्वचछता ठेवण्यासाठी दररोजी महापालिकेचे सफाई कर्मचारी हे काम करीत असतात. या कर्मचाऱ्यांनी देखील स्वत:ची काळजी घेणे आवश्यक असून यासाठी प्रत्येकाने आपले हात हॅण्डवॉश अथवा सॅनिटायझरने स्वच्छ करणे आवश्यक आहे. मात्र बाजारात मिळणारे महागडे हॅण्डवॉश व सॅनिटायझर विकत घेणे न परवडण्यासारखे असते. यासाठी गोदरेज प्रोटेक्ट इंडियाने मि.मॅजिक ही हॅण्डवॉश तयार करणारी पावडर बाजारात आणली असून ही पावडर 200 मि.ली पाण्यात मिसळून हॅण्डवॉश सहज तयार करता येते व हे विकत घेणे सुध्दा सर्वांना परवडण्यासारखे असल्याचे गोदरेजचे सुनील कटारिया यांनी नमूद केले. यावेळी महापौर नरेश म्हस्के यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरुपात महापौर कार्यालयातील कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना गोदरेज प्रोटेक्ट इंडियाने दिलेल्या हॅण्‌डवॉशचे वाटप करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोदरेजने पुढाकार घेतल्याबद्दल महापौर म्हस्के यांनी आभार व्यक्त केले.