• MyPassion
इतिहासाचा वेध घेणारे पुस्तक बाजारात उपलब्ध .
17 Jun, 2019

ठाणे जिल्ह्याला इतिहासात मोठे स्थान असून गड, किल्ले,लेणी,मंदिरे,विरगळे असे विविध प्रकारचे लक्ष वेधून घेणारे तसेच इतिहासाचे साक्ष देणारे प्रेरणादायी गोष्टी ठाण्याला लाभल्या आहेत. याच गोष्टीचा मागोवा घेण्यासाठी इतिहासाचा वेध घेणाऱ्या नवेकोऱ्या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी करण्यात आले. सदाशिव टेटविलकर लिखित 'असे आपले ठाणे' या पुस्तकाचे प्रकाशन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि डॉ विजय बेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचीन काळापासून ठाण्याला इतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक पुस्तकात ठाण्याच्या अनेक वास्तूची नोंद देखील करण्यात आली आहे. दरम्यान दुर्लक्षित इतिहास खुणावर प्रकाशझोत टाकणारे पुस्तक आता बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. लेखक सदाशिव टेटविलकर यांच्या नजरेतून ठाण्याची ऐतिहासीक माहिती देण्यात आली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पुस्तकाचे अनावरण करून शुभेच्छा दिल्या.