• MyPassion
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नगरसेकाकडून धान्याचे वाटप.
12 Jun, 2019

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या शेतकऱ्यांना थोडा दिलासा देण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून युवासेना सचिव तशेच ठाणे महानगर पालिका नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांनी धाराशिव जिल्हा येथील दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांसाठी २ टन अन्नधान्य पाठवले . यावर्षी महाराष्ट्रातील बहुतांश गावांत दुष्काळ पडला आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या करतात तसेच पाऊस लांबल्याने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे दुष्काळाची गंभीर दखल घेवून नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनी शेतकरी बांधवाना अन्नधान्य पाठवले.यावेळी माजी नगरसेवक विहंग सरनाईक, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.