• MyPassion
ड्रेनेजमधून पाणी बाहेर येत असल्याने नौपाडा परिसरातील नागरिक त्रस्त .
14 May, 2019

नौपाडा परिसरातील बाजीप्रभू देशपांडे येथील ब्राम्हण शाळेजवळील रस्त्यावर ड्रेनेजमधून पाणी बाहेर येत असल्याने या परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न झाला आहे विशेष म्हणजे या रस्त्याच्या बाजूला खाद्यपदार्थ विक्री करणारे विक्रेते असून ड्रेनेजचे पाणी बाहेर येत असल्याने त्यांच्या व्यवसायावर देखील याचा परिणाम झाला आहे . गेल्या आठ दिवसांपासून हे घाण पाणी रस्त्यावर येत असून पालिका प्रशासनाचे मात्र याकडे संपूर्णणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे . महिनाभरापूर्वी देखील अशा प्रकारे याच ठिकाणी ड्रेनेजचे पाणी बाहेर येत होते . त्यावेळीही पालिकेने तात्पुरती उपाययोजना करून हे पाणी बंद केले होते . मात्र आता पुन्हा गेल्या आठ दिवसांपासून हे पाणी पुन्हा रस्त्यावरून वाहत असून पालिकेकडून मात्र कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात येत नाही . येत्या काही दिवसात पावसाला देखील सुरुवात होण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाय योजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.