• MyPassion
उत्तर कोरियावर हल्ल्यासाठी सैन्य सज्जः ट्रम्प.
12 Aug, 2017

उत्तर कोरियाशी सुरू असलेल्या तणावावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट हल्ल्याची धमकी दिली आहे. 'हा प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेच्या सैन्याने पूर्ण तयारी केली आहे. यामुळे कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनला आता पर्याय शोधावे लागतील', असं ट्विट करत ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला कारवाईचा इशारा दिला आहे. अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून शाब्दीक चकमक सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्यात तणावात ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटने सर्वांचं लक्ष्य वेधलं गेलं आहे. 'उत्तर कोरिया अशाच प्रकारे अमेरिकेला धमकी देत राहिल्यास जगाने कधी पाहिला नाही अशा महाविनाशाचा सामना उत्तर कोरियाला करावा लागेल', असं ट्विट ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा ट्विट करत उत्तर कोरियाला हल्ल्याचा इशारा दिला आहे.