• MyPassion
धर्मांध शक्तींना सत्तेपासून रोखण्यासाठी महाराष्ट्र बहुजन आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी तसंच समविचारी पक्षांना पाठींबा देण्याचा घेतला निर्णय .
20 Jul, 2019

आगामी विधानसभा निवडणूकीत धर्मांध शक्तींना सत्तेपासून रोखण्यासाठी 100 पेक्षा आधिक संघटनांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीने राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी तसेच समविचारी पक्षांना विनाशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र बहुजन आघाडीचे निमंत्रक माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. आगामी विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात एकास एक लढत कशी होईल, असा विचार सर्व समविचारी पक्षांनी त्याग करायला तयार असले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. 12 बलुतेदार परिवर्तन नावाची संकल्पना घेऊन कमीत कमी 100 पेक्षा आधिक संघटनांचे नेत्यांनी केलेल्या विनंती वरून जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचा राष्ट्रीय महासचिव या नात्याने मी या संघटनांची बैठक घतेली. या सर्व संघटनांनी कुठल्याही अटींशिवाय काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीलाच पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केल्याने आगामी विधानसभा निवडणूकांसाठी महाराष्ट्र बहुजन विकास आघाडीची स्थापना केल्याचे कोळसे पाटील यांनी सांगितले.