• MyPassion
दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय क्रिकेट सामन्याचे आयोजन.
16 Apr, 2019

ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथे क्रिकेटपटूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. अनेक वर्षानी या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया विरुध्द ठाणे हा सराव सामना रंगला. हा सराव सामना पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांनी मोठी गर्दी केली होती. 16 वर्षाखालील गटात झालेला क्रिकेटचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरली. या सराव सामन्यात ठाणे सेंटर संघ 3 गडी राखून विजयी झाला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एकदिवसीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांनी दिली. दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृहातील खेळपट्टी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची तयार करण्यात आली आहे. या खेळपट्टीवर खेळण्याचा सराव व्हावा यासाठी याएकदिवसीय क्रिकेट सराव सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील ठाणे सेंटर संघ विरुध्द ऑस्ट्रेलिया असा 35 षटकांचा सराव सामना आजदिनांक 15 एप्रिल, 2019 रोजी रंगला. हा सराव सामना पाहण्यासाठी ठाणेकर क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथे तयार करण्यातआलेली धावपट्टी ही उत्तम दर्जाची असून याची माहिती ऑस्ट्रेलिया येथे देणार असल्याचे ऑस्ट्रेलिया 16 वर्षाखालील संघाचे प्रशिक्षक ब्रूस वूड (BruceWood) यांनी नमूद केले.