• MyPassion
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी तिसरा 'महापौर जनसंवाद' रद्द .
16 Mar, 2020

कोरोना आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार तिसरा महापौर जनसंवाद रद्द करण्यात आला आहे. येत्या सोमवारी महापौर जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्या सर्वत्र कोरोना आजाराची चर्चा आहे. या आजाराचा प्रादुर्भाव फारसा झाला नसला तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी अनावश्यक गर्दीचे कार्यक्रम टाळण्याची सूचना केली आहे. त्यामुळं महापौरांनीही आपला सोमवारचा जनसंवाद कार्यक्रम रद्द केला आहे