• MyPassion
भारत-चीनमधील तरुण इंटरनेट वापरण्यात अग्रेसर.
02 Aug, 2017

जगभरात इंटरनेटचा वापर करणाऱ्या सुमारे 83 कोटी तरुणांपैकी 39 टक्के तरुण हे भारत व चीन या देशातील असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) एका अहवालाद्वारे समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने (आयटीयू) याबाबतची पाहणी केलेला अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, जगभरातील सुमारे 83 कोटी तरुण एकावेळी इंटरनेटचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. एकूण संख्येच्या तुलनेत 39 टक्के किंवा 32 कोटी तरुण हे भारत व चीन या दोन देशांतील आहेत. "आयटीयू'च्या चालू वर्षातील माहितीनुसार, ब्रॉडबॅंड व इंटरनेटचा वापर करणाऱ्यांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ होत असून, चीन याबाबतीत आघाडीवर आहे. 15 ते 24 या वयोगटातील तरुण सर्वाधिक इंटरनेटचा वापर करतात. हे प्रमाण किमान विकसित देशांमध्ये 35 टक्‍क्‍यांहून अधिक आहे, तर पूर्ण विकसित देशांमध्ये या वयोगटातील 13 टक्के तरुण इंटरनेट वापरत असल्याचे अहवालात नमूद आहे.