• MyPassion
छत्रपती संभाजी महाराज जयंती विशेष .
14 May, 2019

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच आपल्या शौर्याने आणि कतृत्वाने महाराष्ट्राची शान ठरलेले संभाजी महाराज यांची आज जयंती. शिवाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 साली पुण्यातील पुरंदर किल्ल्यावर झाला. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने संभाजी महाराज यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांनी 9 वर्षे राज्य केले. मुघल, सिद्धी आणि पोर्तुगीज यांसारख्या अन्य शासकांविरुद्ध लढा देत त्यांनी मराठा साम्राज्याचे रक्षण केले.छत्रपती म्हणजे छत्र धारण करणारा, सदैव प्रजेला मदत करणारे आणि त्यांचे दुःख वेचून घेणारा, प्रजेच्या संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारा असा राजा. संभाजी महाराजांकडे हे सर्व गुण असल्याने त्यांना छत्रपती असे संबोधले जाते.