• MyPassion
भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्याचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे.
27 Feb, 2020

शहापूर तालुक्यातील वरस्कोळ गावातील जमीनक्षेत्र औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादित करण्यात येत असून त्याची प्रक्रीया जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली येथे सुरु झाली असतांना मालकी आणि वहिवाटीच्या न्यायीक वादात भूसंपादन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे वहिवाटदार शेतकऱ्याला भूसंपादनाचा मोबदला मिळत नसल्याने तो मिळविण्यासाठी येथील शेतकऱ्याने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे. या मागणीसाठी शहापूर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा न्यायासाठी साकडे घालणाऱ्या रमेश दत्तू धसाडे या शेतकऱ्याने दिला आहे. या प्रकरणाचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.                       या जमीनीतून भात, नागळी, वरई आणि उडीदाचे हंगामी पिक घेत होते. दत्तू धसाडे यांचा २००१ मध्ये वयपरत्वे नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर त्यांचा वारस रमेश धसाडे व कुटूंबिय या जमीनीची देखभाल करुन पिकांची लागवड करीत आहेत. दरम्यान महसूल संहितेच्या ७ - १२ सदरी २ ऱ्या क्रमांकाचे मालक असलेल्या अनंत काळण व सामाईक हिस्सेदार  शेतकऱ्यांनी ही जमीन खाजगी विकसक संजय दलीचंद शहा यांना सन. २०१२ मध्ये खरेदीखताने विक्री केली. परंतु या खरेदीखतानंतरही मुळ जमीनीचा ताबा, वहिवाट आणि हंगामी पिकांच्या लागवडीतून येणारी उपभोगीता आजतागायत रमेश धसाडे या शेतकऱ्याच्याच हक्कात राहिली आहे.                          जमीनीची उपोभोगीता धसाडे यांच्या हक्कात राहिल्याने त्याबाबतच्या महसुल संहितेच्या पिक लागवड व वहिवाटीच्या नोंदी महाराष्ट्र महसुल अधि वहिवाटीच्या नोंदी महाराष्ट्र महसुल अधिनियमानुसार शहापूर तहसीलदार व स्थानिक तलाठी यांनी ७ - १२ सदरी नोंदविल्या आहेत. महसुल अधिनियमातील नोंदींमुळे या जमीनीच्या ७ - १२ सदरी नावांची नोंद असलेल्या शहा यांच्याप्रमाणेच धसाडे यांना देखील कायदेशीररित्या पिक लागवड व अंतिम वहिवाटीचा मोबदला मिळण्याची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र भूसंपादन अधिकाऱ्यांच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने न्यायासाठी खेटे झिजविणाऱ्या या शेतकऱ्याने अखेर शहापूर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या या जमीनीच्या मोबदल्यापोटी औद्योगिक वसाहतीच्या भूसंपादनाचा लाभ मिळावा म्हणून त्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याप्रकरणी साकडे घालण्यात आले आहे.