• MyPassion
भूमिगत मलवाहिन्यांचं रूंदीकरण करण्याचं पालकमंत्र्यांचं आश्वासन.
03 Mar, 2020

ठाण्यातील चिखलवाडीचा चिखल आता दूर होणार असून पूर्व द्रूतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पूल रूंदीकरणात भूमिगत मलवाहिन्यांचं रूंदीकरण करण्याचं आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. या परिसरातील भूमिगत मलवाहिन्या अरूंद असल्यानं पावसाळ्यामध्ये भास्कर कॉलनी, चिखलवाडी परिसर बुडतो त्यामुळे कोपरी रेल्वे पूलाच्या रूंदीकरणाच्या कामामध्ये भूमिगत मलवाहिन्यांचं रूंदीकरण करावं अशी मागणी स्थानिक नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी एका निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिसराची पाहणी करून रूंदीकरण करण्याचे आश्वासन दिलं. पावसाळ्यामध्ये हा परिसर जलमय होऊन येथील कुटुंबं प्रभावित होतात. दर पावसाळ्यात पाणी तुंबत असल्यानं महापालिकेच्या वतीनं पंप आणि बोटींगची व्यवस्था करावी लागते. ही समस्या कायमची संपवण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि महापालिकेशी चर्चा करण्यात आली असून भूमिगत मलवाहिन्यांचे रूंदीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.