• MyPassion
भविष्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हाच एकमेव पर्याय.
13 Jun, 2019

योग्य नियोजना अभावी दरवर्षी वाढतच चाललेली पाण्याची टंचाई येणारा काळ किती कठीण याची प्रचिती दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या नियोजनाचे फलीत आहे की आजच्या पिढीला पुरेसे पाणी मिळत आहे. त्यामुळे उद्याच्या पिढीसाठी पाणी राखून ठेवयाचे असेल तर आजच नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे जलतज्ज्ञ सांगत आहेत. अशात जल संवर्धनासाठी पावसाचे पाणी अडवून ठेवणे गरजेचे असून यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग हाच एकमेव पर्याय आहे. सध्या अवघ्या देशालाच पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे. दरवर्षी पाणी टंचाईची समस्या अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. यावर दरवर्षी काहीतरी उपाय करण्याबाबत बोलले जाते, मात्र प्रत्यक्षात काहीच केले जात नाही. परिणामी पाणी दरवर्षी रडवू लागले आहे. पाण्याची निर्मिती शक्य नाही. मात्र पावसाचे पाणी अडवणे व जिरवणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आज हे सूत्र अंमलात आणण्याची गरज आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरायला शंभर वर्षांहून अधिक काळ लागतो. म्हणजेच, आज आपण वापरत असलेले पाणी कित्येक वर्षांपूर्वीचे असून ही आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे.त्यांच्या नियोजनामुळे आज आपल्या पाणी मिळत असून आपण त्याचा नियोजनशून्यपणे वापर करीत आहोत. आज पाणी मिळत असले तरी उद्याच्या पिढीसाठी आपण आज पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. अशात पावसाचे पाणी अडवून त्याला जमिनीत मुरविण्याशिवाय दुसरा उपाय नाही . परिणामी, रेन वॉटर हावेस्टींग हाच एकमेव यावर पर्याय आहे. पावसाचे पाण्याचे जास्तीत जास्त भूमिगत साठवणूक करून ठाणे महापालिकेने काही वर्षेपुर्वीच धोरण बनवलं आहे .ज्या नवीन बिल्डिंग होत आहे त्या बिल्डिंगिना रेन वॉटर हावेस्टींग हे ठाणे महापालिकेने बंधनकारक केलेले आहे . जुन्या ज्या इमारती असतील म्हणजे हे धोरण बण्यापूर्वीच्या त्यांनी रेन वॉटर हावेस्टींग ही यंत्रणा बसवली तर त्यांना ठाणे महानगरपालिका हि ५ % मालमत्ता करा मध्ये रिबिट देतात . तसेच ठाणे महापालिकेच्या इमारती , आरोग्य केंद्र , शाळा , त्या ठिकाणी सुद्धा रेन वॉटर हावेस्टींग ही यंत्रणा कारण्यावहीत केलेली आहे . जेणे करून पावसाचे पाणी हे वाहून जाण्यावजी ते कुठे तरी जमिनी मध्ये मुरून जमिनी मध्ये जी काही पाण्याची पातळी आहे उंचवण्यासाठी मदत होणार आहे