• MyPassion
पाकिस्तान व चीनला भारताने खडसावले
22 Dec, 2017

संकुचित राजकारणापोटी दहशतवादाच्या जागतिक धोक्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाकिस्तान व चीनला भारताने गुरुवारी खडसावले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील ‘कॉम्प्लेक्स कंटेमपररी चॅलेंजेस टू इंटरनॅशनल पीस अँड सेक्युरिटी’ या विषयावरील चर्चेत भाग घेताना भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी पाकिस्तान व चीनला ठणकावले.