• MyPassion
बेघर तसंच निराधार व्यक्तींचे करण्यात येणार सर्वेक्षण .
06 Jun, 2019

महापालिका क्षेत्रामध्ये व्हीमॉक्स ई-सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत शहरातील सर्व भागांमध्ये जाऊन बेघरांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण येत्या १४ जून पर्यंत दिवस-रात्र चालणार आहे. बेघर तसंच निराधार व्यक्ती पदपथावर, चौकात, उड्डाणपूलाखाली, रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानक परिसरात राहतात ज्यांचे ठाणे महापालिका क्षेत्रात कोणतेही घर नाही. जे लोक रस्त्यावर किंवा राहण्यायोग्य नसलेल्या परिस्थितीमध्ये राहतात. ज्यांच्याकडे अनुकुल सुविधा नाहीत अशा व्यक्तींना संभावित निवारा देण्यासाठी आणि मूल्यमापन करण्याच्या कारणास्तव बेघरांच्या सर्वेक्षणाद्वारे साधारण तपशील, कौटुंबिक आणि सामाजिक, आर्थिक परिस्थिती, आरोग्य स्थिती यासंदर्भात तपशील गोळा केला जात आहे. सर्व बेघरांचं सर्वेक्षण होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, निराधार किंवा बेघर लोकं रस्त्यावर किंवा इतर भागात आढळल्यास ७९९ ७० ० ७१ ६७ या क्रमांकावर संपर्क साधून सर्वेक्षणामध्ये मदत करावी ज्यामुळे महापालिका क्षेत्रातील बेघरांना निवारा देण्यास मदत होईल असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे