• MyPassion
पाकिस्तानी महिलेने विमानात दिला बाळाला जन्म
13 Dec, 2017

सौदी अरबच्या मदिनाहून पाकिस्तानच्या मुल्तान शहरात जात असताना एका पाकिस्तानी महिलेने विमानातच एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए)च्या विमानात ही घटना घडली असून पीआयएने या बाळाचे फोटोही टि्वटरवर शेअर केले आहेत. पीआयएच्या पीके-७१६ या विमानात सदर महिलेची प्रसूती झाली. या महिलेला वेदना होऊ लागल्याने विमानातील कर्मचारी तिच्या मदतीसाठी धावले आणि तिची सुखरूप सुटका केली.