• MyPassion
अंगणवाडी महिला कर्मचा-यांचा ठाणे जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा. 
03 Jan, 2020

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी अंगणवाडी महिला कर्मचा-यांनी आपल्या मागण्या शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद कार्यालयावर हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा आंदोलनकेलं .एकात्मिक बालविकास सेवा योजनेत राज्यात सुमारे ८८ हजार अंगणवाडी सेविका, १३ हजार मिनी सेविका व ८७ हजार मदतनिस असे मिळून सुमारे २ लाख अंगणवाडी कर्मचारी काम करीत आहेत. तसेच देशांत सुमारे २८ लाख अंगणवाडी सेविका/मदतनिस काम करीत आहेत. या लाखो महिला अंगणवाडी कर्मचा-यांना शासन शासकीय कर्मचारी मानत नाही तर त्यांना मानसेवी कर्मचारी असे गोंडस नाव दिले गेले आहे. सेविकेला. ८५०० रू. दरमहा, मिनी सेविकेला ५७५० रू. व मदतनिसला ४२५० रू. दरमहा मानधन दिले जाते. या योजनेत काम करणा-या इतर सर्व कर्मचारी अधिका-यांना शासकीय दर्जा दिला गेला आहे. फक्त अंगणवाडी कर्मचा-यांना मानसेवी असे गोंडस नाव देऊन अल्पशा मानधनामध्ये त्यांच्याकडून काम करून घेतले जात आहे. सामाजिक सुरक्षिततेचे कोणतेही फायदे त्यांना दिले जात नाहीत. शासनाकडून वर्षानुवर्षे अंगणवाडी कर्मचा-यांवर वेठबिगारी केली जात आहे, अशी कर्मचा-यांची भावना आहे. राज्यातील लाखो कर्मचा-यांना नोव्हेंबर २०१९ पासून मानधन दिले गेले नाही. तातडीने मानधनाची रक्कम देवून अंगणवाडी कर्मचा-यांची होत असलेली उपासमार थाबवणे. तसेच त्यांना शासकीय कर्मचा-याचा दर्जा देवून सेविकेला तृतीय श्रेणी व मदतनिसला चतुर्थ श्रेणीचे वेतन व सेवेचे सर्व फायदे देण्यात यावे. त्यांना दिले.सेविकेला तृतीय श्रेणी व मदतनिसला चतर्थ श्रेणीचे वेतन व सेवेचे सर्व फायदे देण्यात यावे. त्यांना दिले जाणारे मानधन अल्प आहे त्यामुळे त्यांच्या मानधनात भरघोस वाढ देण्यात यावी. सेवानिवृत्तीच्या दिवशी मिळत असलेल्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन देण्याचे निर्णय करावे, अंगणवाडी कर्मचा-यांना आजारपणाची रजा देणे, लाभार्थ्यांच्या आहाराचे पैसे अॅडव्हान्स द्यावे, रिक्त जागेवर सेविका/मदतनिसांची नियुक्ती करणे या अंगणवाडी कर्मचा-यांच्या मागण्या आहेत.