• MyPassion
विद्या चव्हाण यांच्या राजीनाम्याची भाजपा महिला मोर्चाची मागणी.
06 Mar, 2020

सुनेवर केलेल्या अत्याचाराप्रकरणीठाणे महिला मोर्चा अध्यक्षा हर्षला बुबेरा यांच्या नेतृत्वामध्ये आमदार विद्या चव्हाणयांचा निषेध करण्यात आला.      सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनीराजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनत प्रदेशाध्यक्ष अॅड. माधवी नाईक यांनी मागणी  केली.      आ.  विद्याचव्हाण यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या   कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्हाचीदखल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी भाजपा महिला मोर्चातर्फे आंदोलनकरण्यात आले.       महिलांच्या हक्कासाठीलढण्याचा दिखावा करणा-या विद्या चव्हाण यांचा  खरा चेहरा आज सगळ्यांसमोर आलेलाआहे. सुनेने गुन्हा दाखल केल्यानंतर सुने विरोधातच चारित्र्यहनन करणारे आक्षेपार्हविधान करणेही निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घटनेची दखल घेऊन कठोरकारवाई करावी.सत्तेचा गैरवापर होणार नाही याची खबरदारी संबंधित तपास यंत्रणांनी घेतलीपाहिजे. चव्हाण यांच्या वर्तनामुळे विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. त्यामुळे विद्या चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.त्यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्रप्रदेश अध्यक्षा माधवी नाईक, ठाणे शहर जिल्हा अध्यक्षा हर्षला बुबेरा, सरचिटणीस अॅड.तृप्तीजोशी पाटील, सरचिटणीस नयना भोईर, उपाध्यक्षा प्राची नाईक, विद्या कदम,चिटणीस सुवर्णाअवसरे तसेच महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होत्या.