• MyPassion
टी.एम.टी च्या वाहनचालकांनी काम बंद केल्याचे समजताच, तोडगा काढण्याचे प्रशासनाचे आश्वासन .
09 Oct, 2019

वेतन लवकर मिळावे या मागणीसाठी परिवहन सेवेच्या जीसीसी पद्धतीने चालणाऱ्या बसेसवरील वाहनचालकांनी मंगळवारी अचानकपणे सकाळी काम बंद आंदोलन केल्याने साडेनऊ पर्यंत परिवहनची एकही बस आनंदनगर आगारामधून  पडली नाही . दसऱ्यानिमित्त बहुतेक लोकांना सुट्टी असल्याने याचा जास्त परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला नसला तरी, जवळपास १७० बसेस बाहेर न पडल्याने परिवहनचे काही प्रमाणात नुकसान देखील झाले असून नेमके किती नुकसान झाले आहे याची माहिती काढण्याचे काम प्रशासकडून सुरु करण्यात आले आहे . या कंत्राटी कामगारांचा वेतनाचा प्रश्न देखील काही अंशी निकालात काढण्यात आले असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे . ठाणे परिवहनच्या ताफ्यात परिवहन सेवेच्या मालकीच्या बसेसच्या व्यतिरिक्त जीसीसी पद्धतीने चालणाऱ्या बसेसची संख्या ही ५०० पर्यंत आहे. या बसेसवर कंत्राटी पद्धतीने वाहन चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे . रोज परिवहनच्या वागळे, मुल्ला बाग आणि कळवा आगार अशा तीन आगारामधून १९० बसेस बाहेर पडतात . तर सुट्टीच्या दिवशी १९० बसेस बाहेर न काढता १७० च्या आसपास बसेस बाहेर काढल्या जातात. मात्र मंगळवारी सकाळीच वेतनाच्या मुद्द्यावरून कंत्राटी वाहनचालकांनी अचानकपणे काम बंद केल्याने आनंदनगर  आगारामधून एकही बस रस्त्यावर उतरली नाही . रोज सकाळी साडेचारला पडणाऱ्या बसेस साडेनऊ पर्यंत एकही परिवहनची बस रस्त्यावर दिसली नसल्याने प्रवाशांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला होता . दसऱ्या निमित्त सुट्टी असल्याने याचा फारसा परिणाम जाणवला नाही , साडेनऊ वाजता मात्र बसेस सुरळीत रस्त्यावर धावू लागला असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. मात्र बसेस साडेआठ वाजताच रस्त्यावर उतरल्या असल्याचा दावा प्रशासनाच्या वातींचे करण्यात आला आहे .  वाहनचालकांनी काम बंद केल्याचे समजताच प्रवाशांची पुढची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने या कामगारांबरोबर त्वरित चर्चा करण्यात आली . येत्या दोन दिवसांत यावर तोडगा काढला जाईल असे आश्वासन देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे . मात्र या कंत्राटी वाहन चालकांचा केवळ वेतनाच प्रश्न नसून इतर काही समस्या त्यांच्या असून या सर्व प्रश्नांवर एकत्रित तोडगा काढण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे .