• MyPassion
ठाण्यातील चहाच्या शॉपमधील रेफ्रीजरेटरच्या युनिटमध्ये लागली आग.
02 Sep, 2019

ठाण्यातील घोडबंदररोडवरील कासारवडवली येथील इराणी चहाच्या शॉपमध्ये रेफ्रीजरेटर युनिटमध्ये अचानक आग लागल्याची घटना रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.हे चहा शॉप बाबु लंबोरे यांच्या मालकीचा आहे.या आगीत संतोष चव्हाण व सुर्मला चव्हाणया पती -पत्नीसह त्यांचा मुलगा तन्मय हे किरकोळ होरपळले.सुदैवाने हे कुटुंब वेळीच घराबाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळी ठाणे मनपा अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.आगीचे नेमके कारण कळु शकले नाही.अशी माहिती ठाणे महापालिकेचे आपत्कालीन कक्ष प्रमुख संतोष कदम यांनी दिली.