• MyPassion
लाऊडस्पीकर लावून रात्री-बेरात्री चालणाऱ्या लग्नसमारंभावर घालणार येऊर मध्ये बंदी .
12 Dec, 2019

येऊर येथील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात रात्रीबे-रात्री प्रखर प्रकाशझोतात तसेच लाऊडस्पीकर लावून चालणार्या खेळांना तसेच लग्नसमारंभाना बंदी घालण्यात येणार आहे. येऊर परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी तशा नोटीसा टर्फ मालकांना धाडण्यास सुरुवात केली आहे.या टर्फ क्लबबाबत येऊर येथील स्थानिकांनी येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या माध्यमातून पोलीस प्रशासन तसेच वन अधिकार्यांकडे गेले काही महिने सतत पाठपुरावा केला होता . प्रखर प्रकाशझोतामुळे व गोंगाटामुळे वन्यजीवांच्या हालचालिंवर निर्बंध येतात तसेच ते वाट चुकतात. अलीकडेच बिबट्याच्या मादीने तिचे पिल्लू रस्त्याच्या कडेला आणुन ठेवले होते त्यावरून वन्यजीवन हे रात्रीच्या खेळांमुळे व पार्ट्यांमुळे कसे विस्कळीत झाले आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यामुळे खडबडून जाग्या झालेल्या वनविभागाने तातडीने पावले उचलत या टर्फ क्लबना नोटीसा धाडल्या आहेत. यापुढे अनधिकृत हॉटेल व रेस्टॉरंट वरही अशाच प्रकारच्या कारवाईचे स्पष्ट संकेत वनविभागाच्या या नोटिस मुळे दिसत असल्याने अवैध धंदे चालवणार्यांचे ‘धाबे’ दणाणले आहे.