• MyPassion
कळवा रुग्णालयात नवजात बालकांसाठी 30 बेडचा एनआयसीयू कक्ष सज्ज .
18 Mar, 2020

नवजात बालकांना अनेकदा जन्मानंतर एन.आय.सी.यू कक्षात ठेवण्याची वेळ येते, अनेक ठिकाणी हा एन.आय.सी.यू कक्ष उपलब्ध नसल्यामुळे बालकांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागते अशी वेळ येवू नये यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी सततच्या केलेल्या पाठपुराव्यांना यश आले असून ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एन.आय.सी.यू कक्षात नवजात बालकांसाठी 30 बेडची सोय उपलब्ध करुण्यात आली असून लवकरच हा कक्ष सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापौर यांनी दिली. नुकतीच सोमवारी महापौरांनी राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत या कक्षाची पाहणी केली. नवजात बालकांसाठी सुसज्ज अशा कक्षात बेडची संख्या वाढविल्याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यकत करीत नवजात बालकांसाठी हा कक्ष लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. या पाहणी दरम्यान सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, अतिरिक्त आयुकत 1 राजेंद्र अहिवर, वैद्यकीय अधिष्ठाता शैलेश नटराजन आदी उपस्थीत होते. छत्रपती शिवाजी रुग्णालयात एन.आय.सी.यू बेडची संख्या वाढवावी यासाठी आरोगय समिती सभापती केवलादेवी यादव यांच्यासह उपमहापौर व सदस्या पल्लवी कदम, साधना जोशी, नम्रता फाटक, शिल्पा वाघ, नम्रता घरत, राधाबाई जाधवर, फरझाना शेख, जमीला खान यांनी सतत प्रयत्न केले होते, तसेच याबाबत महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता. महापौर यांनी आरोग्यविभागाशी सततची मागणी करुन तातडीने एन.आय.सी.यू कक्षातील बेडची संख्या वाढविण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठाण्यासह, कळवा, मुंब्रा तसेच अनेक ठिकाणाहून गोर गरीब महिला येत असतात. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या याठिकाणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जन्मानंतर एखाद्या बालकास जर एनआयसीयू कक्षाची गरज भासली तर गैरसोय होवू नये यासाठी या कक्षात आता 30 बेडची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे नवजात बालकांना इतर रुग्णालयात नेण्याची गरज भासणार नसल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. 30 बेडने सुसज्ज असलेल्या या एनआयसीयु कक्षाचे निजंर्तुकीकरण केल्यानंतर लवकरच हा कक्ष नवजात बालकांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अ धिष्ठाता शैलेश नटराजन यांनी नमूद केले. या एनआयसीयू कक्षाचा लाभ आता नवजात बालकांना मिळणार असून हा कक्ष लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना देखील महापौरांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला दिल्या आहेत.