• MyPassion
१५ ऑगस्ट पासून मध्य रेल्वेचे ‘रियल टाइम मोबाइल अॅप’ विकसित.
11 Jul, 2019

उपनगरीय गाडी कुठे आहे आणि किती मिनिटांत स्थानकांत येणार आहे, याची अचूक माहिती मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोबाइलवर मिळण्यासाठी मध्य रेल्वेने ‘रियल टाइम मोबाइल अॅप’ विकसित केले आहे. १५ ऑगस्टला ते कार्यान्वित होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. रेल्वे स्थानकातील इंडिकेटरवर गाडी किती मिनिटांत येत आहे, याची माहिती प्रवाशांना मिळत असते. मात्र काही वेळा त्या माहितीप्रमाणे गाडी येत नाही. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो. त्यात सुधारणा करतानाच प्रवाशांना गाडीची सद्यस्थिती दर्शविणारी सुविधा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. त्यावर सध्या जोमाने काम सुरू आहे. मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुनिल कुमार जैन यांनी उपनगरी गाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवून प्रवाशांना मोबाइलवर अचूक माहिती देण्याची ही योजना असल्याचे सांगितले. त्यानुसार हे अॅप विकसित केले आहे. त्यामुळे गाडी विलंबाने धावत असल्यास त्याप्रमाणे प्रवाशांना पुढील नियोजन करता येणे शक्य होईल. याशिवाय ३० सप्टेंबरपासून प्रवाशांना प्रवासातच ‘कंटेन्ट ऑन डिमांड’ या सुविधेअंतर्गत हॉटस्पॉट वायफायमार्फत गाणी, मालिका आणि अन्य मनोरंजन सुविधा देण्याचेही ठरविण्यात आल्याचे जैन यांनी सांगितले.