• MyPassion
१२ वर्षानंतर भारतीय रेल्वे जगात सर्वोत्तम रेल्वे बनेल- रेल्वेमंत्री पियुष गोयल .
18 Oct, 2019

मुंबईसह देशातील रेल्वेसेवेच्या सक्षमीकरणासाठी तब्बल ५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे नियोजन आहे. त्यात ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकासाचा समावेश आहे. १२ वर्षानंतर भारतीय रेल्वे ही जगात सर्वोत्तम रेल्वे बनेल, असा दावा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. तसेच नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी डब्बल डेकर इंजिनप्रमाणे भाजप-शिवसेना युतीसोबत केंद्र-राज्य शासनाने एकत्रित काम करेल आणि ठाणेकर मतदार न चुकता मोदीसरकारप्रमाणे कामाशी इमानदार असलेले युतीचे उमेदवार संजय केळकर यांना लाखाच्या मताधिक्यांनी विजयी करतील, असा विश्वास गोयल यांनी गुरुवारी ठाण्यात व्यक्त केला.कॉफी वुथ पियुष गोयल हा कार्यक्रम सी.के.पी. हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला व्यावसायिक, कारखानदार, बिल्डर्स, डॉक्टर, वकिल, सोने-चांदीचे व्यापारी, बँकर्स आदी ठाण्याच्या विकासात योगदान देणारी प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर यांनी ठाण्याच्या विकासाची हमी दिल्यानंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिवंगत रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्यापासून ठाणे हे भाजप-शिवसेना युतीचा बालेकिल्ला असल्याची आठवण करून देत ठाण्याचा सर्वांगिण विकासासाठी सरकार कशाप्रकारे कटीबद्ध आहे, हे स्पष्ट केले. आमच्या काळात १०० रुपयांपैकी १५ रुपयेच फक्त लाभार्थीपर्यंत पोहचतात, अशी कबुली देत काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांनी आघाडीच्या काळात भ्रष्टाचार किती बोकाळला होता, हे सांगितले. मात्र त्यावर काही उपाय केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शक कारभार करीत सरकारी योजनेचे १०० पैकी १०० रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात पोहचविण्याची व्यवस्था निर्माण केली